Maharashtrian Food: वरणभाताचा साधा बेत चमचमीत करणारे ६ पारंपरिक पदार्थ, प्रत्येक घास म्हणजे सुख!

वरण-भात हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि साधा पदार्थ आहे, जो घराघरात आवडीने खाल्ला जातो. साधा वरण आणि भात यासोबत चटपटीत भाजी, कुरकुरीत पदार्थ किंवा तोंड
वरण-भात हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि साधा पदार्थ आहे, जो घराघरात आवडीने खाल्ला जातो. साधा वरण आणि भात यासोबत चटपटीत भाजी, कुरकुरीत पदार्थ किंवा तोंडीलावणे असले की जेवणाची चव अधिकच वाढते. वरण भात, तूप आणि लिंबू यांचा संगम म्हणजे एक अद्वितीय अनुभव. वरण-भातासोबत बटाट्याच्या काचऱ्या किंवा काप खाणे खूपच आवडते. बटाट्याच्या पातळ फोडी मसाल्यात परतून किंवा कुरकुरीत करून घेतल्यास वरणाच्या साधेपणाला एक तिखट चव मिळते. याशिवाय कुरकुरीत रवा लावलेले कापही वरण-भातासोबत चविष्ट लागतात.
कुरकुरीत भेंडी वरण-भाताची उत्तम जोडी आहे. भेंडीला मसाला लावून कमी तेलात परतल्यास ती बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होते. तळलेली सांडगी मिरची वरण-भाताची चव खुलवते. गरम तेलात तळलेली सांडगी मिरची वरण-भातासोबत खाल्ल्यास चव अप्रतिम लागते. मिरची दह्यात कालवली तर ती आणखी चविष्ट होते. गवार फ्राय ही एक झटपट तयार होणारी भाजी आहे, जी रोजच्या जेवणासाठी योग्य ठरते. गवार, कांदा, लसूण आणि मसाल्यांसोबत परतल्यास वरण-भातासोबत एक तिखटसर चव मिळते.
ठेचा वरण-भाताला झणझणीत स्वाद देतो. हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाण्याचा ठेचा तयार करून घेतल्यास तो तोंडीलावण्यासाठी अगदी योग्य ठरतो. ताज्या कोथिंबीरचा वापर करणेही आवश्यक आहे. दह्याची कोशिंबीर वरण-भाताच्या बेतात थंडावा आणते. दही, काकडी, कांदा आणि थोडा मसाला एकत्र करून केलेली कोशिंबीर झटपट तयार होते आणि ती तिखट पदार्थांची चव संतुलित करते. या सर्व पदार्थांमुळे वरण-भाताचा अनुभव अधिक समृद्ध आणि आनंददायी होतो. त्यामुळे प्रत्येक घास म्हणजे एक आनंददायी अनुभव असतो.





















