Curiosity:फोडणीतल्या लसणाचा वास का येतो?

लसणाचे कांदे कितीही काळ ठेवले तरी त्यांना काही विशेष वास येत नाही. मात्र, जेव्हा आपण लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करतो, तेव्हा त्यांचा वास अधिक तीव्र होतो. फोडणीत व
लसणाचे कांदे कितीही काळ ठेवले तरी त्यांना काही विशेष वास येत नाही. मात्र, जेव्हा आपण लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करतो, तेव्हा त्यांचा वास अधिक तीव्र होतो. फोडणीत वापरलेल्या लसणाचा वास सर्वत्र पसरतो आणि भुकेची जाणीव करून देतो. लसणाच्या पाकळ्यांमध्ये काही विशिष्ट रसायनं असतात, ज्यामुळे हा वास निर्माण होतो. या रसायनांमध्ये दोन महत्त्वाची रसायनं म्हणजे ‘अलिन’ आणि ‘अलिनेज’. जेव्हा आपण लसूण कापतो किंवा ठेचतो, तेव्हा त्याच्या पेशींची संरचना तुटते आणि या रसायनांचा एकत्रित अभिक्रिया होतो. यामुळे ‘अलिसीन’ नावाचे नवीन रसायन तयार होते, ज्यामुळे लसणाला तीव्र वास येतो. कच्च्या लसणाच्या बाबतीत हा वास अधिक तीव्र असतो, जो आपल्या चवीला एक अनोखा अनुभव देतो.
लसणाच्या वासाबद्दल एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘अलिसीन’ हे रसायन फार काळ टिकत नाही. जेव्हा आपण ठेचलेला लसूण गरम तेलात टाकतो, तेव्हा त्यात तात्काळ बदल होतात. गरम तेलामुळे ‘अलिसीन’चे रासायनिक गुणधर्म बदलतात आणि इतर सल्फरयुक्त रसायनं तयार होतात, जसे की ‘डायअलील डायसल्फाइड’. हे रसायन उग्र वास निर्माण करत नाहीत, तर एक अप्रतिम ‘अरोमा’ तयार करतात, जो अन्नाला स्वादिष्ट बनवतो. त्यामुळे फोडणीच्या वेळी लसणाचा वास अधिक आकर्षक बनतो, जो आपल्या भुकेला उत्तेजित करतो.



















