Traffic Changes in District Collector Office Area:जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे शहरात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी एक मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका
पुणे शहरात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी एक मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोर्चा सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि त्यानंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येईल. मोर्चा संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मार्ग उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक बदलाची योजना पुढीलप्रमाणे आहे: मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्त्याने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी आरटीओ चौकातून इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा कुंभारवेस चौकातून जावे. टपाल कार्यालय चौकातून (जीपीओ) बोल्हाई चौक, मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौकातून वळविण्यात येणार आहे. पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक अलंकार चित्रपटगृह चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळ चौक, कुंभारवेस चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. बॅनजी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौकमार्गे वळविण्यात आली आहे.





















