Transport Minister's Concern: एसटी बसची अवस्था बिकट

मुंबई : एसटी महामंडळाच्या बससेवेतील अनेक बसांमध्ये गळती होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुसळधार पावसात, एसटीच्या छतावरून प
मुंबई : एसटी महामंडळाच्या बससेवेतील अनेक बसांमध्ये गळती होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुसळधार पावसात, एसटीच्या छतावरून पाणी गळत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील शिवनेरी बसचीही अवस्था चिंताजनक आहे. ही प्रीमियम बस असून, यामध्ये प्रवास करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात, तरीही प्रवाशांना गळत्या बसमध्ये प्रवास करावा लागतो. ठाणे-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या समस्येविरुद्ध आवाज उठवला आणि आरडाओरड करत रबाळे येथे बस थांबवली. या घटनेने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
ठाण्यातील वंदना येथून सकाळी ८ वाजता निघालेल्या शिवनेरी बसमध्ये गळती होत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. बस सुटल्यावर काही अंतरावरच पाणी गळत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बसच्या छतावरून आणि इतर भागांतून पाणी येत असल्याने प्रवाशांना जागा बदलण्याची वेळ आली. काही प्रवाशांना त्यांच्या सामानाची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी कसरत करावी लागली. शिवनेरी बस जरी आरामदायी असली तरी गळतीमुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. प्रवाशांनी चालक-वाहकाकडे नाराजी व्यक्त केली, परंतु बसची अवस्था पाहता प्रवास पुढे सुरू ठेवण्यास त्यांनी विरोध केला. अखेर रबाळे येथे बस थांबवण्यात आली आणि दुसरी बस मागविण्याची मागणी करण्यात आली.





















