Book Initiative: वाचनासाठी अनोखा उपक्रम

देशाच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागात जीवन अत्यंत कठीण आहे. येथील दरडी आणि हिमस्खलनामुळे रस्ते वारंवार बंद होतात, हवामानाची अनिश्चितता आणि सीमेपलीकडून येणाऱ्या धो
देशाच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागात जीवन अत्यंत कठीण आहे. येथील दरडी आणि हिमस्खलनामुळे रस्ते वारंवार बंद होतात, हवामानाची अनिश्चितता आणि सीमेपलीकडून येणाऱ्या धोक्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण या सर्व संकटांमध्ये एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे 'बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन' (बीआरओ) नेहमी मदतीसाठी तत्पर असते. या संस्थेचा मुख्य उद्देश रस्ते बांधणे असले तरी, त्याच्यापलीकडेही अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. रस्ते, बोगदे, पूल, रुग्णालये यांसारख्या सुविधा पुरवण्याबरोबरच, बीआरओने आता अनोख्या ग्रंथालयांची स्थापना केली आहे, ज्यामुळे स्थानिकांना वाचनाची संधी मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये लष्करानेही एक वाचनालय सुरू केले आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात 'कीप अ बुक, टेक अ बुक' या उपक्रमांतर्गत शाळा आणि पर्यटन स्थळांवर ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना पुस्तकं सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. वाचनाची आवड वाढवण्यासाठी आणि वाचनातील वैविध्य निर्माण करण्यासाठी या ग्रंथालयांचा उपयोग होत आहे. वाचकांनी वाचून झालेली पुस्तकं ठेवून त्याऐवजी नवीन पुस्तकं घेण्याची संधी मिळते, ज्यामुळे वाचनाची गती वाढते. या ग्रंथालयांची रचना पारंपरिक ग्रंथालयांच्या तुलनेत वेगळी आहे. खुल्या वातावरणात वाचनाचा आनंद घेता येतो, ज्यामुळे वाचकांमध्ये संवाद साधण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. बीआरओने वाचन केंद्रांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.





















