Curiosity: मधमाश्या मध कसा तयार करतात?

मध म्हणजे फुलांच्या मकरंदावर मधमाश्यांनी केलेली प्रक्रिया, ज्यामुळे आपण खाण्यासाठी तयार केलेले अन्न मिळते. मध तयार करणे एकट्या मधमाश्यांचे काम नाही, तर अनेक मधम
मध म्हणजे फुलांच्या मकरंदावर मधमाश्यांनी केलेली प्रक्रिया, ज्यामुळे आपण खाण्यासाठी तयार केलेले अन्न मिळते. मध तयार करणे एकट्या मधमाश्यांचे काम नाही, तर अनेक मधमाश्या एकत्र येऊन सहकार्याने काम करतात. या प्रक्रियेत कामाची विभागणी होते आणि शिस्तबद्धपणे काम केले जाते. मध तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे मकरंद, जो फुलांमधून गोळा केला जातो. यासाठी मधमाश्यांना हजारो फुलांना भेटी देणे आवश्यक असते. एका पोळ्यात साधारणपणे साठ हजार मधमाश्या असतात, आणि अर्धा किलो मध तयार करण्यासाठी हजारो मधमाश्यांना फुलं शोधण्यासाठी भटकावं लागतं. यासाठी जवळजवळ ८० लाख फुलांमधून मकरंद गोळा करावा लागतो. हा सगळा प्रवास एकत्रितपणे केल्यास तो पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा करण्यास समकक्ष आहे.
मधमाश्यांच्या सोंडेसारख्या सूक्ष्म अवयवामुळे त्या फुलांच्या तळाशी जाऊन मकरंद शोषून घेतात. मकरंद त्यांच्या पोटात ठेवला जातो, ज्याला मधू-जठर म्हणतात. मकरंद गोळा केल्यानंतर मधमाश्या परत पोळ्यात येतात, आणि तिथे मकरंद उलटी करून दुसऱ्या मधमाशीच्या तोंडात सोडतात. या प्रक्रियेत मकरंदावर विविध विकरं सोडली जातात. दुसरी माशी तिसऱ्या माशीच्या तोंडात उलटी करून मकरंद सोडते, आणि या प्रक्रियेत असंख्य मधमाश्यांच्या मधू-जठरांमधून मकरंद पुढे जातो. यामध्ये ‘इन्व्हर्टेज’ नावाचं प्रमुख एन्झाइम असतं, ज्यामुळे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतात. याशिवाय ‘ग्लुकोज ऑक्सिडेज’ या विकरामुळे ग्लुकॉनिक आम्ल तयार होतं.





















