Davis Cup Opportunity for Pune's Manas Dhamane: पुण्याचा मानस धामणे भारतीय टेनिस संघात; कोरियाविरुद्ध डेव्हिस चषक लढतीसाठी संधी

नवी दिल्ली : पुण्याचा मानस धामणे, जो हार्ड कोर्टवर खेळण्यास अनुकूल आहे, त्याला प्रथमच भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघात स्थान देण्यात आले आहे. भारताने नेदरलँड्स
नवी दिल्ली : पुण्याचा मानस धामणे, जो हार्ड कोर्टवर खेळण्यास अनुकूल आहे, त्याला प्रथमच भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघात स्थान देण्यात आले आहे. भारताने नेदरलँड्सवर ऐतिहासिक विजय मिळवून पात्रतेच्या पहिल्या फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने सप्टेंबरमध्ये सोल येथे दक्षिण कोरियाविरुद्ध होणाऱ्या पात्रता फेरीतील दोन सामन्यांसाठी मुख्य संघात मोठे बदल टाळले आहेत. मानस धामणे, जो जागतिक क्रमवारीत ३६२व्या स्थानी आहे, तो एकेरीत भारताचा दुसरा मानांकित खेळाडू आहे आणि तो बर्याच काळापासून वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याची प्रतीक्षा करत होता. आता तो अनुभवी सुमित नागल (क्रमवारीत २३५वा) आणि दक्षिणेश्वर सुरेश (क्रमवारीत ३९३वा) यांच्यासह भारताच्या एकेरीची धुरा सांभाळेल. दुहेरीत युकी भांबरी (क्रमवारीत २८वा) आणि एन. श्रीराम बालाजी (क्रमवारीत ५७वा) ही जोडी भारताचे प्रतिनिधित्व करेल. राखीव खेळाडू म्हणून सिद्धार्थ रावत आणि पुण्याच्याच अर्णव पापरकरची निवड करण्यात आली आहे.
निवड समितीच्या सदस्याने सांगितले की, 'खेळाडूंची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारेच झाली आहे. गेल्या वेळी मानस उपलब्ध नव्हता. आता तो मुख्य संघात असला, तरी कर्णधार परिस्थिती पाहून एकेरीच्या संयोजनाचा निर्णय घेतील. अर्णवला भविष्याचा विचार करता राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आले आहे.' नेदरलँड्सवर मिळवलेल्या विजयामुळे भारताने पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. मुख्य संघात धामणेचा समावेश हा एकमेव बदल आहे. या सामन्यातील विजयी संघ नोव्हेंबरमध्ये डेव्हिस चषकाच्या अंतिम टप्प्यातील अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवेल. भारताकडे प्रथमच एलिट गटात पोहोचण्याची संधी आहे.

















