Funny Story from Boxer:भारतीय बॉक्सिंगपटूने मोदींसमोर सांगितला मजेदार किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. या संवादात त्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. या संवादात त्यांनी खेळाडूंचं कौतुक करताना त्यांना काही प्रश्न विचारले. यामध्ये भारताचा रौप्य पदक विजेता कुस्तीपटू नरेंद्र बेरवाल याने एक मजेशीर किस्सा सांगितला, ज्यामुळे उपस्थित सर्वजण हसले. बेरवालने सांगितले की, सामन्यानंतर पाकिस्तानी बॉक्सरने त्याच्याशी संवाद साधला होता, ज्याने पंतप्रधान मोदींनाही हसवले. बेरवालने २०१५च्या मिलिटरी गेम्समध्ये घडलेल्या या प्रसंगाबद्दल सांगितले. त्याला सैन्यातील सहकाऱ्यांकडून स्पष्ट संदेश मिळाला होता की, हा सामना कोणत्याही परिस्थितीत गमावायचा नाही. त्याने सांगितले की, 'माझा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. मी तो सामना जिंकलो, पण दोघांनाही जखमा झाल्या. पहिल्या राऊंडमध्ये मी ४-१ ने जिंकलो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ३-२ ने जिंकलो, पण सामन्यात आमचं डोकं एकमेकांवर आपटलं आणि रुग्णालयात जावं लागलं.' सामन्यानंतर दोन्ही बॉक्सर्स रुग्णालयात असताना एक मजेदार योगायोग समोर आला. बेरवालने सांगितले की, त्या स्पर्धेत त्याचे आर्मी प्रशिक्षक यांचं नावही नरेंद्र होतं. पाकिस्तानी बॉक्सरने हसत त्याला म्हटले, 'तुझं नाव नरेंद्र, तुझ्या कोचचं नाव नरेंद्र आणि तुमच्या पंतप्रधानांचं नावही नरेंद्र... मला 'नरेंद्र' नावाचाच तिरस्कार वाटायला लागला आहे!' हा किस्सा सांगताना बेरवालने पाकिस्तानी बॉक्सरची अॅक्शन करत रंगवून सांगितले, ज्यामुळे उपस्थित सर्वजण मोठ्याने हसू लागले. हा प्रसंग ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समधील भारताच्या विक्रमी बॉक्सिंग मोहिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात घडला. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग पथकाने ७ सुवर्ण आणि ३ रौप्य अशी एकूण १० पदकं जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली.


















