Revolutionary Space Project: अमेरिकेच्या ‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल’ने आणलेली नवी क्रांती

सूर्य हा नेहमीच दिवसा आकाशात तळपत असतो, परंतु आता रात्रीही तो आकाशात तळपत राहील आणि आपल्याला सूर्यप्रकाश देईल, ही कल्पना आता वास्तवात येऊ शकते. अमेरिकेतील ‘रिफ्
सूर्य हा नेहमीच दिवसा आकाशात तळपत असतो, परंतु आता रात्रीही तो आकाशात तळपत राहील आणि आपल्याला सूर्यप्रकाश देईल, ही कल्पना आता वास्तवात येऊ शकते. अमेरिकेतील ‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल’ या कंपनीने अंतराळात एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. अमेरिकन सरकारने या कंपनीला विशाल परावर्तक आरशासह उपग्रह पाठवण्याची परवानगी दिली आहे. या उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील काही विशिष्ट भागांवर सूर्यकिरण परावर्तित करून रात्री उजेड निर्माण करणे शक्य होणार आहे. या प्रयोगामुळे जर यश मिळाले, तर संपूर्ण जगासाठी ही एक महत्त्वाची उपलब्धी ठरेल.
या प्रयोगासाठी ‘एरेन्डिल-१’ नावाचा उपग्रह तयार करण्यात येत आहे, ज्यामध्ये सुमारे ६० फूट रुंद परावर्तक आरसा बसवला जाईल. हा उपग्रह पृथ्वीपासून ६४० किलोमीटर उंचीवरील कक्षेत कार्यरत राहील. गरज भासल्यास, हा उपग्रह सूर्यकिरण विशिष्ट ठिकाणी वळवून त्याचा उपयोग करेल. कंपनीच्या मते, या तंत्रज्ञानामुळे ५ किलोमीटरच्या परिसरात पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशापेक्षा चार पट अधिक उजेड उपलब्ध होईल. रिफ्लेक्ट ऑर्बिटलची योजना महत्त्वाकांक्षी असून, कंपनीने २०२६ च्या अखेरीपर्यंत दोन उपग्रह अंतराळात पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर २०२७ पर्यंत ३६ उपग्रहांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. २०३५ पर्यंत ५०,००० हून अधिक उपग्रह तैनात करण्याची कंपनीची दीर्घकालीन योजना आहे.





















