Rice Planting Experience: विद्यार्थ्यांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी उपक्रम

ठाणे: आधुनिक काळात विद्यार्थ्यांचा शेतीशी संपर्क कमी होत चालला आहे. त्यामुळे पर्यावरण दक्षता मंडळाने निसर्गायण टिटवाळा प्रकल्पांतर्गत भात रोप लावणीचा एक विशेष उ
ठाणे: आधुनिक काळात विद्यार्थ्यांचा शेतीशी संपर्क कमी होत चालला आहे. त्यामुळे पर्यावरण दक्षता मंडळाने निसर्गायण टिटवाळा प्रकल्पांतर्गत भात रोप लावणीचा एक विशेष उपक्रम आयोजित केला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना पारंपरिक कृषी पद्धतींची माहिती देण्यात आली आणि त्यांना प्रत्यक्ष भाताची रोपे लावण्याचा अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांनी स्वतः भाताची रोपे लावून शेतीच्या महत्त्वाची जाणीव केली. या उपक्रमात विद्यार्थ्यांना भाताच्या रोपांची काढणी, रोपांच्या मुठी बांधण्याची पद्धत, तसेच लावणीपूर्वी शेतातील चिखलाची तयारी कशी करावी, याबद्दल माहिती देण्यात आली. शेतात तण वाढू नये म्हणून चिखलाची मशागत कशी करावी, गांडूळ खताचा उपयोग कसा करावा आणि लावणीसाठी योग्य जमीन कशी तयार करावी याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना शेतीच्या विविध पैलूंवर सखोल माहिती मिळाली.
उपक्रमानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला भाताच्या रोपांची मूठ देण्यात आली आणि योग्य अंतरावर रोपे लावण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आवण धरून भात लावणी केली, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेता आला. यावेळी भातशेतीसाठी पाण्याचे महत्त्व, माती, जैवविविधता आणि हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम याबाबतही माहिती दिली गेली. निसर्गायण टिटवाळा हा पर्यावरण शिक्षण व पर्यटन प्रकल्प असून, 'अनुभवातून पर्यावरण शिक्षण' देण्यावर संस्थेचा भर आहे. यामध्ये वृक्षारोपण, निसर्गभ्रमंती, जैवविविधता अभ्यास, मियावाकी व बारव संकल्पना यासारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचे कार्य केले जाते.





















