Controversy After Commonwealth Games: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर पाकिस्तान आणि युगांडाचे खेळाडू बेपत्ता

ग्लास्गो: २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर एक चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पाकिस्तान आणि युगांडाचे काही खेळाडू मायदेशी परतले नसून ते रहस्यमयर
ग्लास्गो: २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर एक चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पाकिस्तान आणि युगांडाचे काही खेळाडू मायदेशी परतले नसून ते रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन स्कॉटलंड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अनेक खेळाडू बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली असून या संदर्भात ब्रिटनच्या गृह मंत्रालयाशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानने फक्त एकच पदक मिळवले होते, त्यामुळे या बेपत्ता खेळाडूंमुळे त्यांच्या देशात पुन्हा एकदा चर्चेला तोंड द्यावे लागले आहे.
युगांडाच्या सहा सदस्यीय बॉक्सिंग पथकातील चार खेळाडू मायदेशी रवाना होण्यापूर्वीच बेपत्ता झाले आहेत. यामध्ये एका खेळाडूने स्थानिक माध्यमांना सांगितले की, तो ब्रिटनमध्ये आश्रय मागण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा बॉक्सर कुदरतुल्लाह हाही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान बॉक्सिंग महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदरतुल्लाहला पहाटे दोन वाजता हॉटेलमधील खोलीत पाहण्यात आले होते, परंतु सकाळी संघ रवाना होत असताना तो आढळला नाही. विशेष म्हणजे त्याचा पासपोर्ट आणि परतीचे विमान तिकीट अद्याप संघ व्यवस्थापकाकडेच असल्याचे सांगण्यात आले आहे.
















