Water Release Continues from Radhanagari: राधानगरीच्या दोन दरवाज्यातून विसर्ग सुरूच

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्णपणे भरले असून, यामध्ये ८.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. सकाळी ७ वाजता दिलेल्या अहवालानुसार, धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ आ
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्णपणे भरले असून, यामध्ये ८.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. सकाळी ७ वाजता दिलेल्या अहवालानुसार, धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ आणि ६ खुले आहेत. यामुळे स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहाद्वारे एकत्रितपणे ४,२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी गुरुवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पंचगंगा नदी आणि उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत स्थिरता येऊ लागली आहे. दुपारी चार वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३० फूट ७ इंच (५३९.५१ मीटर) इतकी आहे आणि येथे ३१,५५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये राधानगरी, कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला आणि कोदे लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर कुंभी धरणात ८९.७२ टक्के, वारणा धरणात ८८.२६ टक्के, कासारी धरणात ८६.७१ टक्के, पाटगाव धरणात ८३.८३ टक्के आणि दूधगंगा धरणात ८१.०२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, कासारी, भोगावती, कुंभी, तुळशी, ताम्रपर्णी, हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीवरील एकूण ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.



















