Impact of Dolphin Cyclone:चीनच्या ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम

मुंबई: प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. अफगाणिस्तानकडून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या कोरड्या
मुंबई: प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. अफगाणिस्तानकडून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली असून, १५ ऑगस्टपर्यंत या भागात पावसाची शक्यता नाही. चीनच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचीही चर्चा सुरू आहे. या चक्रीवादळामुळे प्रशांत महासागरातील आणि बंगालच्या उपसागरातील हवामानाच्या यंत्रणेवर परिणाम झाला आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, १ जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. तथापि, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ, यांचे म्हणणे आहे की, या चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात मोठे वादळ किंवा तीव्र हालचाली सक्रिय असताना, ते भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची दिशा आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती तात्पुरती मंदावू शकतात. त्यामुळेच बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या ढगांचे प्रमाण घटले असून, भारतात पावसाने ब्रेक घेतला आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे १५ ऑगस्टपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरही चांगल्या पावसाची शक्यता आहे. १५ ऑगस्टनंतर कोकणातील पावसाचा जोरही ओसरणार असून २६ ते ३१ ऑगस्टदरम्यान पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची आशा आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज उद्या मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. कोकण आणि गोव्यामध्ये या आठवड्यात पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. समुद्रातील हवामानाची अनुकूल प्रणाली, आयओडीची साथ आणि मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस अपेक्षित आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे मंगळवार आणि बुधवारी पावसाच्या सरींचा वेग वाढणार आहे.





















