Cooking Tips for Dal Tadka:दाल तडका बनवण्यासाठी १० महत्त्वाच्या टिप्स

हॉटेलमध्ये मिळणाऱ्या दाल तडका चवीसाठी तुम्हाला फक्त तुरीची डाळ वापरण्याची गरज नाही. यासाठी तुरीच्या डाळीच्या सोबत मुगाची डाळ आणि मसूरची डाळ एकत्र करून वापरली तर
हॉटेलमध्ये मिळणाऱ्या दाल तडका चवीसाठी तुम्हाला फक्त तुरीची डाळ वापरण्याची गरज नाही. यासाठी तुरीच्या डाळीच्या सोबत मुगाची डाळ आणि मसूरची डाळ एकत्र करून वापरली तर चव अधिक गडद आणि दाट येते. डाळ शिजवण्यापूर्वी ती पूर्णपणे कोरडी करून एक चमचाभर तुपावर मंद आचेवर १ ते २ मिनिटे भाजा. यामुळे डाळीला एक अप्रतिम चव येते. कुकरमध्ये डाळ लावताना त्यात पाणी, हळद, २-३ लसणाच्या पाकळ्या, १ हिरवी मिरची आणि थोडं मोहरीचं तेल घालणे आवश्यक आहे. डाळ शिजवताना ती पेस्टसारखी मऊ होऊ नये. कुकरच्या ३ शिट्ट्या काढल्यानंतर, डाळ हलकी मॅश करा. ढाबा स्टाईल डाळसाठी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून त्याची प्युरी न करता सोनेरी रंग येईपर्यंत परतवा. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा आणि तेल सुटत जाईपर्यंत थांबा.
डाळ उकळताना त्यात १ लहान चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घाला. ही टिप ढाबा स्टाईल चव आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ढाब्यावर नेहमी दोन वेळा तडका दिला जातो. पहिला तडका डाळ आणि कांदा-टोमॅटो एकत्र शिजवताना दिला जातो आणि दुसरा तडका सर्व्ह करताना वरून दिला जातो. तडका देताना तूप किंवा तेल चांगलं गरम करणे आवश्यक आहे. गॅस बंद करून त्यात कश्मिरी लाल तिखट आणि हिंग घाला, जेणेकरून तिखट जळणार नाही आणि रंग छान येईल.





















