Shravan Special Shopping: घुंगरू मंगळसूत्र फक्त ६०० रुपयांत, मंगळागौरीसाठी आकर्षक दागिने

श्रावण महिना येताच सण, पूजा आणि पारंपरिक साजश्रृंगाराची तयारी सुरू होते. विशेषतः महिलांना या काळात दागिन्यांची खरेदी करण्याची खूप आवड असते. श्रावणातील प्रत्येक
श्रावण महिना येताच सण, पूजा आणि पारंपरिक साजश्रृंगाराची तयारी सुरू होते. विशेषतः महिलांना या काळात दागिन्यांची खरेदी करण्याची खूप आवड असते. श्रावणातील प्रत्येक सणासाठी खास पारंपरिक लूक तयार करण्यासाठी मंगळसूत्र हे एक महत्त्वाचे दागिनं आहे. साडी, नऊवारी किंवा साध्या कुर्तीवर मंगळसूत्र परिधान केल्यास एक वेगळा आकर्षण निर्माण होतो. सध्या बाजारात पारंपरिक मंगळसूत्रांमध्ये आधुनिक डिझाइनची भर पडली आहे. घुंगरू, गोल लटकन, कमळ, मोर आणि कोरीव काम असलेल्या पेंडंटचे मंगळसूत्र हे महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. हे मंगळसूत्र ६०० रुपयांच्या आत उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्व स्तरातील महिलांना ते खरेदी करता येईल.
श्रावणात मंगळागौरीच्या पूजेसाठी किंवा सणासुदीच्या दिवशी हिरव्या, जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या किंवा निळ्या साडीवर हे मंगळसूत्र अगदी उठून दिसते. मोठ्या आणि जड नेकलेसऐवजी नाजूक पण आकर्षक मंगळसूत्र रोजच्या वापरासाठीही योग्य ठरते. यामध्ये दोन गोल लटकन असलेले काळे मणी मंगळसूत्र, ज्यामध्ये काळ्या मण्यांसोबत सोनेरी चेन आणि नक्षीदार गोल लटकन आहेत, हे विशेष आकर्षक आहे. हे मंगळसूत्र हिरवी पैठणी, मोरपंखी किंवा पिवळी सिल्क साडीवर विशेष उठून दिसते. मंगळागौरीच्या पूजेसाठीही हे मंगळसूत्र एक उत्तम पर्याय आहे.





















