Traditional Wheat Kheer for Shravan:श्रावण सोमवारी गव्हाची खीर बनवण्याची सोपी पद्धत

श्रावण महिना हा भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक भक्त उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी विशेषतः गव्ह
श्रावण महिना हा भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक भक्त उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी विशेषतः गव्हाची खीर बनवली जाते, जी एक पारंपरिक आणि लोकप्रिय नैवेद्य आहे. गव्हाची खीर केवळ चविष्टच नसून आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. गव्हामध्ये भरपूर फायबर असते, तर गुळामध्ये आयरन आणि अन्य पोषक तत्वे असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीराला आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी गव्हाची खीर एक उत्तम पर्याय आहे. अनेक वेळा गव्हाची खीर बनवताना गहू कडक राहतो किंवा खीर दाटसर होत नाही. परंतु कुकरचा वापर करून योग्य प्रमाणात साहित्य घेतल्यास खीर मऊ, रसरशीत आणि बासुंदीसारखी बनवता येते. यामुळे श्रावणी सोमवारी नैवेद्यासाठी गव्हाची खीर बनवणे अधिक सोपे होते. चला तर मग, गव्हाची खीर बनवण्याची सोपी पद्धत पाहूया.
गव्हाची खीर बनवण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे अर्धा कप गहू, दीड कप पाणी, अर्धा कप चिरलेला गूळ, एक मोठा चमचा साजूक तूप, आवडीनुसार सुक्या खोबऱ्याचे काप, सुक्या मेव्याचे तुकडे (जसे की काजू, बदाम, पिस्ता), चिमूटभर सुंठपूड, वेलची पूड आणि जायफळ पूड. सर्वप्रथम गहू स्वच्छ धुवून ६ ते ८ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा. भिजलेले गहू निथरून मिक्सरच्या भांड्यात घालून पाण्याशिवाय २ ते ३ सेकंद प्लस मोडवर फिरवून घ्या. यामुळे गहू थोडा जाडसर होईल. नंतर कुकरमध्ये साजूक तूप गरम करून त्यात सुक्या खोबऱ्याचे काप आणि सुक्या मेव्याचे तुकडे टाका आणि हलके सोनेरी होईपर्यंत तळा.





















