Supreme Court's Controversial Remarks:सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त टिप्पण्या

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी सध्या राजकीय व कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. मोइत्रा यां
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी सध्या राजकीय व कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. मोइत्रा यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टच्या संदर्भात पोलिसांसमोर व्हर्च्युअल उपस्थितीची मागणी केली होती, त्यावर न्यायालयाने त्यांना चांगलाच दणका दिला. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, 'राजकारणात आल्यानंतर अंडी फेकण्याला का घाबरता? आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी तर छातीवर गोळ्या झेलल्या होत्या.' या टिप्पणीनंतर मोइत्रा यांच्या वकिलांनी याचिका मागे घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पण्या आता अनेकांच्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या संदर्भात आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, 'सर्वोच्च न्यायालय आता प्रत्येकाने गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करत आहे का?' दिपके यांच्या या ट्विटमुळे न्यायालयाच्या भाषेवर आणि टिप्पणीच्या स्वरूपावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
महुआ मोइत्रा यांच्याविरोधात पश्चिम बंगालमधील एका पोलीस ठाण्यात चिथावणीखोर वक्तव्य आणि धार्मिक भावना दुखवल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयाने मोइत्रा यांना पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आणि तपास अधिकाऱ्यासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तथापि, मोइत्रा यांनी स्थानिक पातळीवर विरोधकांकडून अंडी आणि टोमॅटो फेकले जाण्याची शक्यता दर्शवित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला सामोरे जाण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टिप्पण्या आता वादग्रस्त ठरल्या आहेत.



















