Youth Popularity Survey: तरुणांमध्ये लोकप्रियतेचा कडवट सामना!

दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या cjp च्या आंदोलनानंतर, देशातील तरुणांचा आणि जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी 'सी-व्होटर'ने एक विशेष सर्व्हेक्षण आयोजित केले. या सर्व्हे
दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या CJP च्या आंदोलनानंतर, देशातील तरुणांचा आणि जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी 'सी-व्होटर'ने एक विशेष सर्व्हेक्षण आयोजित केले. या सर्व्हेतून पेपर लीकच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणाबद्दल, सरकारच्या निर्णयांबाबत आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा याबाबत जनतेचे विचार समोर आले आहेत. 'इंडिया टुडे' वाहिनीवर या आकडेवारीचे प्रकाशन करण्यात आले आहे, ज्यामुळे देशातील तरुणांच्या मनातील विचारांचे स्पष्ट चित्र उभे राहते. शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याच्या संदर्भात, ३१.७% लोकांनी कठोर 'अँटी-पेपरलीक' कायद्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. याशिवाय, २७.२% लोकांच्या मते शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आवश्यक आहे. १६.७% लोकांनी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना सुचवली, तर ११.९% लोकांनी NTA मध्ये व्यापक बदलांची आवश्यकता असल्याचे सांगितले. इतर पर्यायांमध्ये ६.९% लोकांनी इतर सुधारणांचे पर्याय निवडले, तर ५.७% लोकांनी 'माहीत नाही' असे उत्तर दिले. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याबाबत जनतेची अपेक्षा किती मोठी आहे.
सरकारच्या निर्णयांबाबत जनतेच्या संतोषाची पातळी देखील या सर्व्हेतून समोर आली आहे. पेपर लीक थांबवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पावलांबद्दल, जसे की अँटी-पेपर लीक कायद्याची दुरुस्ती आणि तज्ज्ञ समितीची स्थापना, याबाबत ५०.७% लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे. याउलट, ३३.२% लोकांनी सरकारच्या निर्णयांबाबत समाधान व्यक्त केले, तर १६.१% लोकांनी 'माहीत नाही' असे उत्तर दिले. संसदेत पेपर लीक संदर्भात झालेल्या चर्चेबद्दल ३९% लोकांनी समाधान व्यक्त केले, तर ३५.६% लोकांनी नकारात्मक उत्तर दिले. यामुळे स्पष्ट होते की, जनतेच्या मनात सरकारच्या निर्णयांबाबत किती असमाधान आहे आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सुधारणा किती महत्त्वाच्या आहेत.
















