America Tariff: अमेरिका भारतावर 100 टक्क्यांपर्यंत टेरिफ लावणार, आयातीवर काय परिणाम होईल?

वॉशिंग्टन: रशियाकडून तेल, नैसर्गिक वायू आणि इतर वस्तूंची खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लावण्याच्या तरतुदीसह रशियावरील निर्बंधांच्या विधेयकाला अमेरिकी सिनेटने शुक
वॉशिंग्टन: रशियाकडून तेल, नैसर्गिक वायू आणि इतर वस्तूंची खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लावण्याच्या तरतुदीसह रशियावरील निर्बंधांच्या विधेयकाला अमेरिकी सिनेटने शुक्रवारी मोठ्या बहुमताने मंजुरी दिली. या विधेयकाला ८६ खासदारांनी समर्थन दिले, तर ११ जणांनी विरोध दर्शविला. या विधेयकात भारतासहित पाच देशांवर १०० टक्क्यांपर्यंत टेरिफ लावण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना देण्यात आले आहेत. हे विधेयक रशियाच्या युद्धाला आर्थिक पाठबळ देणारा महसूल कमी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल किंवा नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या जगातील पाच प्रमुख देशांच्या आयातीवर शुल्क लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना देण्याची तरतूद त्यात आहे. या पाच देशांमध्ये भारत आणि चीन यांचा समावेश आहे.
राष्ट्राध्यक्षांना शुल्क किती लावायचे किंवा त्याची अंमलबजावणी करायची की नाही, याबाबत अधिकार देण्यात आले आहेत. रशियाकडून १५ टक्क्यांपेक्षा कमी नैसर्गिक वायू आयात करणाऱ्या आणि ही आयात कमी करण्यासाठी पावले उचलणाऱ्या देशांना काही सवलती मिळू शकतात. विधेयकात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, वरिष्ठ राजकीय व लष्करी अधिकारी, रशियन वित्तीय संस्था आणि ऊर्जा प्रकल्पांवरही निर्बंध प्रस्तावित आहेत. रशियाकडून तेल निर्यातीत वापरल्या जाणाऱ्या जुन्या आणि नाव बदललेल्या टँकरवरही निर्बंध वाढविण्याची तरतूद आहे. या विधेयकाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. आता प्रतिनिधीगृहात त्यावर मतदान होऊन ते राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे.


















