World Breastfeeding Week 2026:तान्ह्या बाळाला पाणी कधी द्यायचे, किती द्यायचे? स्तनपानातून बाळाची तहान भागते का?

स्तनपानाचा महत्त्वाचा काळ म्हणजे बाळाच्या जन्मानंतरचा पहिला सहा महिने. या काळात बाळाला पाणी देण्याबाबत डॉक्टरांचे स्पष्ट निर्देश असतात. नवजात बाळाच्या आहारात आई
स्तनपानाचा महत्त्वाचा काळ म्हणजे बाळाच्या जन्मानंतरचा पहिला सहा महिने. या काळात बाळाला पाणी देण्याबाबत डॉक्टरांचे स्पष्ट निर्देश असतात. नवजात बाळाच्या आहारात आईचे दूध हे एकट्याचं अन्न असतं, ज्यामध्ये आवश्यक सर्व पोषणतत्त्वे समाविष्ट असतात. बाळाच्या आहारात पाण्याची गरज नाही, कारण आईच्या दुधातच पुरेसे पाणी असते. बाळाच्या आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की सहा महिन्यांपर्यंत त्याला पाणी देऊ नये. यामागील कारण म्हणजे नवजात बाळाची किडनी अजून विकसित होत असते आणि त्यांना अधिक पाण्याची गरज नसते. जर बाळाला अधिक पाणी दिले गेले, तर त्याचा रक्तातील इलेक्ट्रोलाइट पातळ होऊ शकतो, ज्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाच्या पोषणात अडथळा येतो. आईच्या दुधामुळे बाळाला आवश्यक सर्व अन्नघटक मिळतात आणि त्याची तहान भागते.
बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध द्यावे लागते. सहा महिन्यांनंतर, जेव्हा बाळाला इतर अन्नाची गरज भासते, तेव्हा पाण्याचे प्रमाण वाढवता येईल. मात्र, पाणी देताना ते गरजेनुसारच द्यावे लागेल. सुरुवातीला काही चमचे पाणी देणे योग्य ठरते आणि जसजशी बाळाची वाढ होत जाईल, तसतसे पाण्याचे प्रमाण देखील वाढवावे लागेल. बाळाच्या सुसूच्या रंगावरून आपण बाळाला अधिक पाण्याची गरज आहे का हे ओळखू शकतो. बाळाला पाणी देताना त्याच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण बाळाच्या पोटात जागा कमी असल्याने अधिक पाण्यामुळे पोषणात अडथळा येऊ शकतो.



















