Weak Body Parts:शरीरातील अवयव नेमके कधी होतात कमकुवत?

वाढत्या वयासोबत शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडत असतात. अनेक लोक अशक्तपणा किंवा थकवा हा वयाचा परिणाम आहे, असे मानतात. परंतु, प्रत्येक अवयवाचे आरोग्य चांगले नसल्यास
वाढत्या वयासोबत शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडत असतात. अनेक लोक अशक्तपणा किंवा थकवा हा वयाचा परिणाम आहे, असे मानतात. परंतु, प्रत्येक अवयवाचे आरोग्य चांगले नसल्यास शरीराची एकूण शक्ती कमी होऊ शकते. चुकीचा आहार, अपुरी झोप, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि काही आजार यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आरोही यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे की, “आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याची जितकी काळजी घेतो, तितकीच शरीरातील अवयवांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. कारण एकदा हे अवयव खराब झाले की त्यांना पुनःप्राप्त करणे शक्य होत नाही.” त्यामुळे प्रत्येक अवयव निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
वयानुसार शरीरातील पेशींची दुरुस्ती होण्याचा वेग कमी होतो. यामुळे स्नायूंचे प्रमाण कमी होते आणि हळूहळू हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत आणि डोळ्यांच्या कार्यक्षमतेत बदल दिसून येऊ लागतात. योग्य काळजी घेतल्यास या समस्यांचा सामना कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ, अतिशय थंड, तिखट आणि मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात. वारंवार कान स्वच्छ करणे किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव ही फुफ्फुसे कमकुवत होण्याची प्रमुख कारणे आहेत, त्यामुळे नियमित श्वसनाचे व्यायाम आणि चालणे फायदेशीर ठरू शकते.



















