Outbreak of Chandipura Virus in Gujarat:गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा उद्रेक

गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा विषाणूचा (chpv) उद्रेक झाला आहे, ज्यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तथापि, मुंबईत अद्याप या विषाणूचा एकही रुग
गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा विषाणूचा (CHPV) उद्रेक झाला आहे, ज्यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तथापि, मुंबईत अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चांदीपुरा विषाणूचा हा भारतातील पहिलाच उद्रेक नाही. यापूर्वी २००३-०४ मध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेशासह विविध भागात या विषाणूचा प्रसार झाला होता. सध्या गुजरातमध्ये या विषाणूचा उद्रेक झाला असला तरी केंद्र आणि राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेली नाही, असे आरोग्य विभागाचे प्रतिनिधी सांगतात. तरीही, महापालिका प्रशासनाने याबाबत आवश्यक पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी विलगीकरण सुविधांची तयारी करण्यात आली आहे. संभाव्य रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी कस्तुरबा रुग्णालयात १० खाटांचा समर्पित विलगीकरण कक्ष तयार केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा विभाग, राज्य शासन आणि केंद्र शासन, तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), नवी दिल्ली यांच्याशी समन्वय साधला आहे. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालये व प्रयोगशाळा यांच्याशी समन्वय साधण्यात येत आहे, जेणेकरून या विषाणूच्या संभाव्य प्रसारावर नियंत्रण ठेवता येईल.





















