New Regulations for Blood Banks:राज्यातील सर्व रक्तपेढ्या व केंद्रांसाठी कडक नियमावीली जाहीर

पुणे: राज्यातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांच्या कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एक महत्त्वाची नियमावली जाहीर केली आह
पुणे: राज्यातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांच्या कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एक महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचा उद्देश रक्तसुरक्षा, गुणवत्ता आणि पारदर्शकता यांना प्राधान्य देणे आहे. रक्तसंकलनापासून ते रुग्णांना रक्त वितरण करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यासाठी स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रे अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय बनतील, हे लक्षात घेतले पाहिजे.
एफडीएच्या आदेशानुसार, राज्यातील सर्व परवानाधारक रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांनी औषधे व प्रसाधने कायद्यानुसार सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मानवी रक्त आणि रक्तघटकांना औषध म्हणून मान्यता दिली गेली आहे, त्यामुळे वैध परवान्याशिवाय रक्त संकलन, प्रक्रिया, साठवण किंवा वितरण करणे शक्य नाही. याशिवाय, प्रत्येक रक्तपेढीने नियमित सेल्फ ऑडिट करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आणि ई-रक्तकोश पोर्टलवर रक्तसाठ्याची माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.





















