Shravan Month 2026:श्रावण मास २०२६: किती श्रावणी सोमवार? कोणती शिवामूठ कधी वाहावी?

श्रावण महिन्याची सुरुवात १३ ऑगस्ट २०२६ पासून होत आहे. हा महिना चातुर्मासातील एक महत्त्वाचा कालखंड आहे, ज्यामध्ये व्रत आणि उपासना यांचे विशेष महत्त्व आहे. श्रावण
श्रावण महिन्याची सुरुवात १३ ऑगस्ट २०२६ पासून होत आहे. हा महिना चातुर्मासातील एक महत्त्वाचा कालखंड आहे, ज्यामध्ये व्रत आणि उपासना यांचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी विविध व्रतांचे आयोजन केले जाते, जे आध्यात्मिक, शास्त्रीय आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णू योग निद्रेत जातात आणि त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडाचे नियंत्रण महादेव शिवशंकर यांच्याकडे येते. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी विशेष व्रतांचे आयोजन केले जाते. यंदा २०२६ मध्ये किती श्रावणी सोमवार आहेत, कोणती शिवामूठ कधी वाहावी आणि कोणता मंत्र म्हणावा याबद्दल माहिती घेऊया.
श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ म्हणून ओळखला जात असे. या महिन्यात श्रवण नक्षत्र रात्रीच्या प्रारंभात उगवते आणि पहाटे पश्चिमेस मावळते. श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्राच्या जवळ असतो, त्यामुळे या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. या महिन्यात व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचा मार्ग नाही, तर एकमेकांतील नाते संबंध जपणारी आणि वृद्धिंगत करणारी एक भावनिक प्रक्रिया आहे. लग्नानंतर पहिल्या पाच वर्षांत महिलांनी शिवास्त वाहण्याचे व्रत करणे आवश्यक आहे. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये शंकरांचे पूजन करून आप्तेष्टांना बोलवावे आणि ब्राह्मण भोजन करावे लागते.





















