Deep Amavasya 2026: यंदा 'अशी' साजरी करा दीप अमावस्या; अविस्मरणीय ठरेल, आयुष्य उजळून निघेल!

दीप अमावस्या हा सण आपल्या जीवनात एक विशेष महत्त्व राखतो. या दिवशी अंधार दूर करण्याची आणि प्रकाशाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. स्वदेस चित्रपटातील त्या आजीच
दीप अमावस्या हा सण आपल्या जीवनात एक विशेष महत्त्व राखतो. या दिवशी अंधार दूर करण्याची आणि प्रकाशाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. स्वदेस चित्रपटातील त्या आजीची आठवण येते, जिच्या घरात पहिल्यांदा बल्ब लागल्यावर तिने आनंदाने 'बिजली... बिजली!' असे म्हटले होते. आजही अनेक खेडेगावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. अलीकडील पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अशा वेळी, आपण आपल्या परीने मदत करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मकतेची, विश्वासाची आणि आशेची ज्योत प्रज्वलित करू शकतो. दीप अमावस्येचा मूळ हेतू म्हणजे अंधार दूर करणे, मग तो आपल्या जीवनातील असो किंवा दुसऱ्यांच्या जीवनातील, तो निश्चित साध्य होऊ शकतो. त्यामुळे या दिवशी आपण एकत्र येऊन मदतीचा हात देऊ शकतो.
सध्याच्या काळात, ट्यूबलाइट्स, बल्ब आणि सौरदिवे यांसारख्या आधुनिक दिव्यांचा वापर वाढला आहे. यामुळे, आपण या दिव्यांचा दान करून समाजातील गरजू लोकांना मदत करू शकतो. शाळा, आश्रम किंवा संस्थांना दिवे देणे किंवा त्यांच्या लाईट बिलाची रक्कम भरणे हे एक चांगले कार्य ठरू शकते. याशिवाय, एखाद्या लामणदिवा किंवा समई विकत घेऊन मंदिरात दान करणे आणि देवासमोर प्रज्वलित करणे हे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या देशात अनेक देवळे आहेत जिथे अनास्थेमुळे देवांची नित्यपूजा होत नाही. अशा ठिकाणी या दिवशी स्वच्छता करून, मूर्तीची पूजा करून आणि दिवाबत्ती करून आपण त्या देवळाचे पावित्र्य अबाधित ठेवू शकतो.





















