Shocking Murder Plot Revealed: पत्नीच्या हत्येचा भीषण कट उघड झाला

तेलंगणातील खम्मम परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका पतीने आपल्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणा
तेलंगणातील खम्मम परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका पतीने आपल्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात पत्नीच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम चॅटमुळे संपूर्ण कट उघडकीस आला. राजेश्वर राव यांनी पोलिसांत धाव घेत सुरक्षेची मागणी केली आहे आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. महबूबाबाद जिल्ह्यातील चिलाकोड गावातील गाडे राजेश्वर राव यांचा विवाह २०१६ मध्ये भवानी नावाच्या महिलेशी झाला होता. या दांपत्याला दोन मुले आहेत. राजेश्वर राव हे खम्मम इथल्या एका खासगी रुग्णालयात नोकरी करतात आणि कुटुंबासह तेथेच राहत होते. राजेश्वर राव यांनी लावलेल्या आरोपांनुसार, त्यांची पत्नी भवानी हिचे सैदुलू नावाच्या एका कूरियर डिलिव्हरी करणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. २७ जुलै रोजी राजेश्वर राव जेवणासाठी घरी आले असता, त्यांनी पत्नीला आणि त्या तरुणाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यामुळे त्यांच्या वादाला सुरुवात झाली. या घटनेनंतर २८ जुलै रोजी गावात पंचायत बोलावण्यात आली होती. पंचायतीनंतर राजेश्वर राव हे आपल्या मोठ्या भावाला आणण्यासाठी शेजारच्या गावी जात असताना, सैदुलूने त्यांचा पाठलाग केला. मात्र, राजेश्वर राव तेथून सुरक्षितपणे निघून जाण्यात यशस्वी झाले. राजेश्वर राव यांनी पत्नीचा मोबाईल तपासला असता त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. मोबाईलमधील व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम चॅटमध्ये पत्नी भवानी आणि प्रियकर सैदुलू यांच्यात राजेश्वर राव यांच्या हत्येचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. भवानीने प्रियकराला मेसेज पाठवून, "माझ्या पतीला रस्ता अपघातात मारून टाक, नाहीतर मी स्वतःचा जीव देईन," असे सांगितले. भवानीने याशिवाय हत्या घरात न करता बाहेर रस्त्यावर करावी आणि त्याला रस्ता अपघात असल्याचे दाखवावे, असेही सुचवले. राजेश्वर राव यांनी या सर्व चॅटचे स्क्रीनशॉट्स काढून आपल्या कडे ठेवले. आपल्या जीवाला गंभीर धोका असल्याचे लक्षात येताच, राजेश्वर राव यांनी १ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी झिरो एफआयआर दाखल करुन पुढील तपासासाठी हे प्रकरण खम्मम ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. तथापि, तक्रार दाखल केल्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करत राजेश्वर राव यांनी गुरुवारी पुन्हा खम्मम ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि नवीन तक्रार देऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.



















