Discussion with Chief Minister for Fast-Tracking Minor Assault Case:नागपूर: अल्पवयीन अत्याचार खटला जलद गतीने चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नागपूर: हुडकेश्वर पोलीस हद्दीत एक अत्यंत गंभीर घटना घडली आहे, ज्यात शासकीय अधिकाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात आरो
नागपूर: हुडकेश्वर पोलीस हद्दीत एक अत्यंत गंभीर घटना घडली आहे, ज्यात शासकीय अधिकाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे याने खोटे बोलून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले. त्याने तिचा भ्रमणध्वनी हॅक केला आणि मैत्रीच्या बहाण्याने तिला भेटण्यासाठी बोलावून अपहरण केले. तिला एका खोलीत बंद करून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला नसता, तर मुलीचा जीव गेला असता. या गंभीर घटनेची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नरसापूरच्या धर्तीवर जलदगतीने खटल्याचे न्यायालयीन कामकाज चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधानपरिषद सदस्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी रविवारी सांगितले.
या घटनेने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. विधानपरिषद सदस्या डॉ. गोऱ्हे यांनी रविवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर पोलिसांनी सबळ पुरावे सादर करूनही न्यायालयाने आरोपी निर्भय पाखरे याला केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. न्यायाधिशांनी पोलिसांना तपासासाठी इतका कमी वेळ दिला याबद्दल त्यांना खंत वाटते.





















