UPI Transaction Charges: UPI यूजर्सना मोठा दिलासा! व्यवहारांवर शुल्काबाबत केंद्राचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या चर्चेला केंद्र सरकारने शनिवारी पूर्णविराम दिला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, सामान्य यूपीआय व्यवहारांसाठी
नवी दिल्ली : यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या चर्चेला केंद्र सरकारने शनिवारी पूर्णविराम दिला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, सामान्य यूपीआय व्यवहारांसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय, लहान व्यापाऱ्यांसाठी यूपीआय सेवा मोठ्या प्रमाणात मोफतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीमुळे यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण देत ग्राहकांना यूपीआयच्या सामान्य वापरासाठी शुल्क आकारण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे की, त्यांच्या रोजच्या व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, भविष्यात व्यापाऱ्यांकडून मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारण्याचा निर्णय घेतला गेला, तरी तो सर्व व्यवहारांवर लागू होणार नाही. ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक मोठ्या व्यापारी व्यवहारांवरच नाममात्र शुल्क आकारण्याची शक्यता आहे. हे संभाव्य शुल्क डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांसाठी यूपीआय सेवा मोठ्या प्रमाणात मोफतच राहणार असल्याने किराणा दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि कमी किमतीच्या व्यवहारांमध्ये यूपीआयचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





















