Change Your Perspective on RBI: सहकारमंत्री अमित शहा यांचे नागरी सहकारी बँकांना आवाहन

मुंबई: नागरी सहकारी बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सहकारमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेने नागरी सहका
मुंबई: नागरी सहकारी बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सहकारमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि यामुळे बँकांनीही त्यांच्या दृष्टिकोनात बदल करावा, असे त्यांनी शहरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींना सांगितले. अमित शहा यांच्या उपस्थितीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनयूसीएफडीसी) नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासह सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि १,४०० हून अधिक शहरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहा यांनी यावेळी सोन्यावरील कर्जाची मर्यादा वाढविणे आणि शहरी सहकारी बँकांना एकरकमी कर्जफेडीची (ओटीएस) सुविधा देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. आरबीआयने जाहीर केलेल्या धोरणात्मक निर्णयांमध्ये शहरी सहकारी बँकांना ‘ऑन-टॅप’ परवाना देण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दोन दशकांपासून रखडलेली ही प्रक्रिया आता गती घेणार आहे.
अमित शहा यांनी एनयूसीएफडीसीचे मुख्यालय लवकरच नवी दिल्लीहून महाराष्ट्रात हलविण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ४४९ नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत आणि महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये देशातील सुमारे ७० टक्के नागरी सहकारी बँका आहेत. सध्या एनयूसीएफडीसीचे ६९० सदस्य आहेत आणि शहा यांनी सर्व १,४०० शहरी सहकारी बँकांनी या संस्थेचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले. सदस्यत्व शुल्क कमी करण्याची मागणी करताना त्यांनी या संस्थेमार्फत तांत्रिक मार्गदर्शन, अनुपालनासाठी मदत आणि अत्याधुनिक सायबर सुरक्षा उपाय उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.





















