Shahrukh Khan Named India's Most Valuable Celebrity: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात महागडा स्टार; रणवीर दुसऱ्या स्थानी, सलमान टॉप १० च्याही बाहेर!

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानने पुन्हा एकदा भारतातील सर्वात महागड्या सेलिब्रिटी म्हणून स्थान मिळवले आहे. त्याने आपल्या ब्रँड व्हॅल्यूच्या जोरावर हे स्थान मिळव
बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानने पुन्हा एकदा भारतातील सर्वात महागड्या सेलिब्रिटी म्हणून स्थान मिळवले आहे. त्याने आपल्या ब्रँड व्हॅल्यूच्या जोरावर हे स्थान मिळवले असून, गेल्या वर्षभरात त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसतानाही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'डंकी' हा त्याचा शेवटचा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता, आणि त्यानंतरही त्याची ब्रँड व्हॅल्यू १,६९४ कोटी रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. याबरोबरच, त्याच्या जाहिरातींची संख्या २८ वरून ३६ पर्यंत वाढली आहे, ज्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.
या यादीत दुसऱ्या स्थानी अभिनेता रणवीर सिंहने स्थान मिळवले आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या यशानंतर रणवीरने क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. रणवीरची ब्रँड व्हॅल्यू १५५० कोटी रुपये इतकी आहे. यादीतील तिसरे स्थान क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावावर आहे, तर चौथे स्थान सचिन तेंडुलकर आणि पाचवे स्थान महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. क्रिकेटपटूंनंतर यादीत स्थान मिळवणारी पहिली अभिनेत्री आलिया भट आहे, जिने २०२५ मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित केला नाही, तरी तिची ब्रँड व्हॅल्यू ८९४ कोटी रुपये आहे.



















