Ramayana Release Dates: रणबीर कपूरचा 'रामायण' भारतात आणि विदेशात वेगवेगळ्या दिवशी होतोय रिलीज, कारण काय? जाणून घ्या...

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या 'रामायण' या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित हा भव्य चित्र
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या 'रामायण' या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित हा भव्य चित्रपट ६ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार आहे, तर भारतात हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरला रिलीज होईल. या दोन वेगवेगळ्या रिलीज तारखांमागील कारण निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवारी होते, त्यामुळे तिथे ६ नोव्हेंबरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात मात्र, दिवाळीच्या शुभ दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत आहे. यामुळे भारतीय प्रेक्षकांना आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दिवाळीच्या सणामुळे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे, असेही मल्होत्रा यांनी सांगितले. याच संदर्भात सलमान खानच्या 'टायगर ३' चित्रपटाचे उदाहरण दिले आहे, जो दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. त्या वेळी दिवाळी रविवारी होती, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम झाला होता. 'टायगर ३' ने पहिल्या दिवशी ४४.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते, जे यशराज फिल्म्सच्या 'पठाण'च्या तुलनेत कमी होते. 'पठाण'ने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती, कारण तो प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडच्या आधी रिलीज झाला होता. त्यामुळे 'टायगर ३' ला वीकेंडचा फायदा मिळाला नाही आणि त्याची पहिल्या पाच दिवसांतची कमाई १८७.६५ कोटी रुपये होती.




















