Approval for Gobar Dhan Scheme: केंद्राची 'गोबरधन' योजनेला मंजुरी; पेट्रोलमध्ये इथेनॉलनंतर आता CNG मध्ये 'बायो-गॅस' मिळण्याची तयारी?

केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता cng आणि png मध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (cbg) मिश्रणाची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत
केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता CNG आणि PNG मध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) मिश्रणाची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ६ ऑक्टोबर २०२३ रोजी २३,७३१ कोटी रुपयांच्या गोबरधन योजनेला मंजुरी दिली. या योजनेचा मुख्य उद्देश शेतीतील अवशेष, जनावरांचे शेण, उसाची बगॅस, नगरपालिका क्षेत्रातील जैविक कचरा आणि इतर जैविक संसाधनांचे रूपांतर स्वच्छ इंधन, सेंद्रिय खत आणि ग्रामीण उत्पन्नाच्या साधनांमध्ये करणे आहे. यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर उपाययोजना होणार आहेत. CBG म्हणजे सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारे नूतनीकरणीय इंधन आहे, जे CNG आणि PNG मध्ये मिश्रित केले जाऊ शकते. यामुळे जीवाश्म इंधनावर अवलंबित्व कमी होईल आणि देशातील नैसर्गिक वायूच्या आयातीवरही परिणाम होईल. ही योजना २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत राबवली जाणार आहे.
CBG हे विद्यमान CNG पायाभूत सुविधांमध्ये सहज समाविष्ट करता येते. CBG-CGD Synchronisation योजनेअंतर्गत CBGला सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे स्वतंत्रपणे मोठ्या पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता कमी होईल. CBGची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांपासून पाइपलाइनद्वारे ते सिटी गॅस नेटवर्कमध्ये पोहोचवले जाऊ शकते, ज्यामुळे CNG वाहनांसाठी तसेच घरगुती PNGसाठी वापरता येईल. National Biofuels Coordination Committee (NBCC) ने देशात CNG आणि PNG क्षेत्रात CBGचे अनिवार्य मिश्रण टप्प्याटप्प्याने लागू करण्यास मंजुरी दिली आहे. इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या मिश्रणाची सुरुवात १ टक्क्याने होणार आहे.




















