Video: क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची व्याघ्र सफारी

वर्धा : व्याघ्र सफारी सध्या पर्यटनाच्या जगात एक नवा ट्रेंड बनत आहे. सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी या सफारीत भाग घेऊन विदर्भातील नैसर्गिक सौंदर्याचा
वर्धा : व्याघ्र सफारी सध्या पर्यटनाच्या जगात एक नवा ट्रेंड बनत आहे. सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी या सफारीत भाग घेऊन विदर्भातील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेतला आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशी या नव्या पिढीच्या क्रिकेटपटूनेही सहभाग घेतला आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांसह जंगल सफारीचा अनुभव घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे राजस्थान रॉयल संघाच्या प्रशिक्षण केंद्रावर भेट दिली. या ठिकाणी वन परीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी त्यांना निमंत्रण दिले होते. वैभवने या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत जंगल सफारीसाठी येण्याचे आश्वासन दिले होते.
गुरुवारी, वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जंगलात प्रवेश केला. शुभम दुबे, रवी सिंग आणि सुशांत मिश्रा यांच्यासोबत व्यवस्थापक रोमी देखील त्यांच्यासोबत होते. वन अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि सफारी सुरू झाली. क्रिकेटपटू वाघ पाहण्याच्या उत्सुकतेने भरलेले होते. सफारीच्या गाड्या जंगलात फिरत असताना, त्यांना एक धिप्पाड बिबट्या आणि अस्वल दिसले. सांबर, चितळ आणि मोर यांची झुंडी देखील त्यांना पाहायला मिळाली. मात्र, वाघ दिसत नसल्यामुळे त्यांची उत्सुकता कमी होत नव्हती. वैभवने वाघ पाहण्याचा हट्ट धरला होता, त्यामुळे वन अधिकाऱ्यांना एक पेचात टाकले होते.





















