Pod Hotel Project Delayed:माथेरान पॉड हॉटेलची योजना तीन वर्षांनंतरही कागदावरच

मुंबई : माथेरानमध्ये जपानच्या धर्तीवर आधुनिक पॉड हॉटेल उभारण्याची मध्य रेल्वेची महत्त्वाकांक्षी योजना सध्या कागदावरच राहिलेली आहे. या योजनेचा उद्देश पर्यटकांना
मुंबई : माथेरानमध्ये जपानच्या धर्तीवर आधुनिक पॉड हॉटेल उभारण्याची मध्य रेल्वेची महत्त्वाकांक्षी योजना सध्या कागदावरच राहिलेली आहे. या योजनेचा उद्देश पर्यटकांना कमी खर्चात अत्याधुनिक निवास सुविधा उपलब्ध करून देणे होता. तथापि, या योजनेची घोषणा झाल्यानंतर तीन वर्षे उलटून गेली तरी अद्याप या हॉटेलच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. माथेरान हे मुंबईपासून ११० किमी आणि पुण्यापासून १२० किमी अंतरावर स्थित आहे, त्यामुळे येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून २० किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी एक दिवसाच्या सहलीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी सर्व प्रमुख पर्यटक स्थळे पाहण्यासाठी एक ते दोन दिवस लागतात, त्यामुळे पर्यटकांना राहण्यासाठी चांगल्या सुविधांची आवश्यकता आहे. याच कारणामुळे मध्य रेल्वेने पॉड हॉटेल सुरू करण्याची योजना आखली होती.
भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पॉड हॉटेल सुरू करून चांगला प्रतिसाद मिळवला होता. यानंतर, माथेरानमध्येही अशाच प्रकारच्या हॉटेलची घोषणा करण्यात आली होती. हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या 'नॉन फेअर रेव्हेन्यू इन्कम स्कीम' अंतर्गत राबविण्यात येणार होता. तथापि, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, माथेरानमध्ये पॉड हॉटेलचे कोणतेही काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाबद्दलच्या अपेक्षा कागदावरच राहिल्या आहेत.



















