Analysis: सोन्या-चांदीची तेजी आणखी किती दिवस..? गुंतवणूकदारांना काय सल्ला?

जागतिक सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजीचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत. सोन्याच्या किमतींनी वाढ नोंदवत तब्बल सात आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरातही
जागतिक सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजीचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत. सोन्याच्या किमतींनी वाढ नोंदवत तब्बल सात आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय सुधारणा झाल्याने मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचे चित्र आहे. तेजीचा हा प्रवास आणखी किती काळ टिकणार आणि त्याचा भारतीय बाजारावर काय परिणाम होणार, याबाबत गुंतवणूकदार, व्यापारी आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत एक ऑगस्टपर्यंत २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,२९० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी अधिक फरकाने सातत्याने दरवाढ होत राहिल्याने सहा ऑगस्टपर्यंत सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,९५५ रुपयांपर्यंत पोहचले. तब्बल ५६६५ रुपयांची वाढ सोन्याच्या दरात नोंदवली गेली. विशेष म्हणजे तीन जुलैनंतर पहिल्यांदा दीड लाखांचा आकडा सोन्याने ओलांडला. अशाच प्रकारे जळगावात एक ऑगस्टपर्यंत चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,२६,००० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी अधिक फरकाने दरवाढ होत राहिल्याने सहा ऑगस्टपर्यंत चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,३४,८४० रुपयांपर्यंत पोहचले. तब्बल ८२४० रुपयांची वाढ चांदीत नोंदवली गेली.

















