Gold Loan Demand Surges:देशात सोने तारण कर्जाची मागणी वाढली

भारतातील कर्जांच्या प्रकारांमध्ये सोने तारण कर्जाची मागणी अत्यंत वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून (
भारतातील कर्जांच्या प्रकारांमध्ये सोने तारण कर्जाची मागणी अत्यंत वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून (NBFC) दिल्या जाणाऱ्या सोने तारण कर्जात अभूतपूर्व वाढ झाली आहे. जून २०२६ मध्ये या कर्जाची एकूण रक्कम ६९.३ टक्क्यांनी वाढून ३.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जे गेल्या वर्षीच्या २.०२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. या कर्जाच्या वाढीमागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे, कागदपत्रांची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि दुसरं म्हणजे, कर्जाची रक्कम काही मिनिटांत ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते. त्यामुळे नागरिकांना तातडीच्या आर्थिक गरजांसाठी सोने तारण ठेवणे अधिक सोयीचे झाले आहे. सोने तारण कर्जाच्या या वाढीमुळे NBFC कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे, विशेषतः मणप्पुरम आणि मुथूट फायनान्स सारख्या आघाडीच्या कंपन्यांना.
सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सामान्य नागरिक आणि लहान उद्योजकांना त्यांच्या दागिन्यांवर अधिक रकमेचे कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. जानेवारी २०२६ मध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १ लाख ८० हजार रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे सोने तारण कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे किरकोळ कर्जामध्ये २०.३ टक्के वाढ झाली आहे, तर एक वर्षापूर्वी ही वाढ १४.३ टक्के होती. यामुळे NBFC च्या एकूण पत वाढीमध्ये किरकोळ कर्जाचा महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय, औद्योगिक क्षेत्राला मिळणाऱ्या कर्जाचा वेग मंदावला आहे, ज्यामुळे उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा वाढीव दर यंदा ६.७ टक्क्यांवर आला आहे, जो गेल्या वर्षी १०.३ टक्के होता.



















