FCRA Controversy:मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका

नागपूरमध्ये एफआरसीए सुधारणा विधेयकावरून चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावर आपली ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की
नागपूरमध्ये एफआरसीए सुधारणा विधेयकावरून चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावर आपली ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, काही संस्थांनी एफसीआरएचा वापर करून देशात निधी आणला आहे, परंतु तो निधी देशविरोधी क्रियाकलापांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे एफआरसीए सुधारणा विधेयकाची आवश्यकता निर्माण झाली आहे. अमेरिकेतील काही लोक या विधेयकामुळे चिंतित झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, परदेशातून डोनेशन घेणाऱ्या संस्थांना एफआरसीएची परवानगी आवश्यक आहे आणि हे विधेयक कोणत्याही विशिष्ट समुदायाच्या विरोधात नाही. त्यांनी यावर जोर दिला की, जे चांगले कार्य करतात त्यांच्यासाठी या विधेयकात कोणतीही अडचण येणार नाही. जे संस्थांचे हिशेब योग्य आहेत, त्यांना परवानगी मिळेल. याबाबत जर कुणाला काही बोलायचे असेल तर ते संसदेत बोलू शकतात. केंद्र सरकार सर्वांचे म्हणणे ऐकून घेणारे आहे. फडणवीस यांनी हे देखील स्पष्ट केले की, एफआरसीए सर्व समाजाच्या संस्थांसाठी आवश्यक आहे, केवळ ख्रिश्चन समुदायासाठी नाही.
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याबाबत देखील आपली मते व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान हे कोणत्या एका पक्षाचे नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्यांना भेटले तरी त्यात काही चुकीचे नाही. मुख्यमंत्री असल्याने अनेक विरोधी पक्षांचे नेते देखील त्यांना भेटतात आणि त्यांच्या समस्या मांडतात. त्यामुळे या भेटींवर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.





















