Legal Battle Over Adani Ends: अदानींवरील अमेरिकेतील सर्व कायदेशीर संघर्ष संपले

न्यू यॉर्क आणि नवी दिल्ली यांच्यातील अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल करण्यात आलेला लाचखोरी आणि आर्थिक फसवण
न्यू यॉर्क आणि नवी दिल्ली यांच्यातील अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल करण्यात आलेला लाचखोरी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा आता संपला आहे. न्यू यॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टाने अमेरिकेच्या न्याय विभागाची याचिका स्वीकारत हा खटला ‘विथ प्रेज्युडिस’ या तत्त्वावर कायमचा रद्द केला आहे. यामुळे अदानी समूहाला गेल्या पावणेदोन वर्षांपासून सुरू असलेल्या या हाय-प्रोफाइल कायदेशीर संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. न्यायमूर्ती निकोलस गाराउफिस यांच्या खंडपीठाने न्याय विभागाच्या विनंतीवर विचार करून हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अदानी, सागर अदानी आणि अदानी ग्रीनचे माजी CEO विनीत जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, हा खटला खटल्याच्या पूर्वतयारीच्या टप्प्यावरच बंद करण्यात आला आहे, त्यामुळे कोणत्याही साक्षीदारांची तपासणी किंवा पुराव्यांची चाचणी झाली नाही.
अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणात दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते की, हा खटला पुढे चालवणे आता सार्वजनिक आणि न्यायाच्या हिताचे राहिलेले नाही. या प्रकरणात गंभीर अधिकारक्षेत्रीय अडचणी आणि पुराव्यांशी संबंधित आव्हाने आहेत. सर्व कथित व्यवहार आणि घटना मुख्यत्वे भारतात घडल्या आहेत आणि भारतीय यंत्रणांनी आधीच या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. याशिवाय, अमेरिकन गुंतवणूकदारांचे कोणतेही प्रत्यक्ष आर्थिक नुकसान झालेले नाही, असा युक्तिवाद न्याय विभागाने केला. न्याय विभागाने असेही नमूद केले की, नोव्हेंबर २०२४ मध्ये जो बायडेन प्रशासनाच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात दाखल करण्यात आलेला हा खटला प्रामुख्याने राजकीय हेतूने प्रेरित होता.





















