Viral Video: जपानमधील भारतीय पर्यटकाचा अपमान

जपान हा देश जगभरात आपल्या निसर्गसौंदर्यामुळे आणि आदरातिथ्यामुळे प्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडेच येथे एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठा
जपान हा देश जगभरात आपल्या निसर्गसौंदर्यामुळे आणि आदरातिथ्यामुळे प्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडेच येथे एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडाला आहे. शिजुओका शहरात एका भारतीय पर्यटकाला वर्णद्वेष आणि अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. या घटनेत, स्टोअरच्या मॅनेजरने भारतीय पर्यटकावर अपमानास्पद टिप्पणी केली आणि त्याला धाक दाखवण्यासाठी पोलिसांना बोलावले. परंतु, जपानी पोलिसांनी या घटनेची सत्यता तपासून पाहिल्यानंतर मॅनेजरच्या वर्तनावर कठोर कारवाई केली. अनंत नावाच्या या भारतीय पर्यटकाने आपल्या अनुभवाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनंत हे जपानच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवशी शिजुओका येथील एका प्रसिद्ध '७-इलेव्हन' स्टोअरमध्ये गेले होते. तिथे त्यांनी एक नेपाळी कर्मचाऱ्याला अन्न गरम करण्याची विनंती केली. त्या कर्मचाऱ्याने तत्काळ होकार दिला, मात्र त्याचवेळी स्टोअरची मॅनेजर तिथे आली आणि तिचे वर्तन अत्यंत आक्रमक होते. ती अनंत यांच्यावर ओरडत होती आणि त्यांना विचारले की ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत. अनंत यांनी भारताचे असल्याचे सांगितल्यावर मॅनेजरचा राग आणखी वाढला आणि तिने त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पण्या करायला सुरुवात केली.



















