Dengue Outbreak in South Goa:दक्षिण गोव्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे

दक्षिण गोव्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेत चिंता निर्माण झाली आहे. मडगाव येथील जिल्हा रुग्णालयाने दिलेल्य
दक्षिण गोव्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेत चिंता निर्माण झाली आहे. मडगाव येथील जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२६ महिन्यात आतापर्यंत ७१ रुग्णांना डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहे. यामध्ये २७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सजग राहण्याची आवश्यकता भासू लागली आहे. गेल्या काही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट होते. मे महिन्यात फक्त ९ रुग्णांची नोंद झाली होती, परंतु जूनमध्ये हा आकडा ३८ वर पोहोचला. जुलै महिन्यात डेंग्यूची लाट उसळली आणि एकाच महिन्यात ९१ रुग्ण आढळले. या वाढत्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणेत सतर्कता वाढवण्यात आली आहे.
सद्यस्थितीत डेंग्यूचा प्रसार रोखणे ही एक मोठी आव्हानात्मक बाब ठरली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सलग ३ ते ४ दिवस ताप आल्यास तो साधा ताप समजून दुर्लक्ष करणे धाडसाचे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.





















