Beauty With Brain: पूजा सावंतने इमोजीच्या आधारे म्हणी ओळखल्या

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिचा अभिनय आणि सौंदर्य यामुळे तिला कलरफूल अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिच्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिचा अभिनय आणि सौंदर्य यामुळे तिला कलरफूल अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिच्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. पूजा नेहमीच विविध आणि हटके भूमिका साकारण्याकडे लक्ष केंद्रित करते. तिचा जन्म मुंबईत झाला आणि तिने दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेतले. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे तिचा मराठी भाषेवरचा अधिकार खूपच मजबूत आहे. शालेय जीवनात तिला उत्तम संस्कार मिळाले आहेत, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच ठसा उमठला आहे. संस्कृत विषय आणि स्त्रोत्र पठन यासारख्या गोष्टी शाळेत अनिवार्य असल्याने तिला भाषेवर विशेष प्रभुत्व मिळाले आहे. अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच सांगते की शाळेचा मुलांच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा असतो. तिच्या भाषेवरील कौशल्याने एकदा पुन्हा सिद्ध केले आहे की ती किती हुशार आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती काही इमोजीच्या आधारे मराठी म्हणी ओळखत आहे.
या व्हिडीओमध्ये आरजे गायत्री पूजाला काही इमोजी दाखवते आणि त्या इमोजीवरून तिला म्हणी ओळखायला सांगते. पहिल्या इमोजीमध्ये गाढव, चौकोनी बॉक्स आणि जीभ यांचा समावेश आहे, ज्यावरून ती पटकन ओळखते की ही म्हण आहे “गाढवाला गुळाची चव काय?” यानंतरच्या इमोजींच्या आधारे तिने इतर काही म्हणीही अचूक ओळखल्या, जसे की ‘पी हळद आणि हो गोरी’ आणि ‘घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ’. या व्हिडीओमध्ये एक इमोजी असतो ज्यावर ती म्हण ओळखण्यात कमी पडते, पण तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये ती म्हण अचूक ओळखली आहे. ती म्हण आहे ‘कामापुरता मामा, ताकापुरती आजी!’ या सर्व गोष्टींमुळे पूजा सावंतच्या बुद्धिमत्तेवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.





















