Shocking Incident in Delhi:दिल्लीतील महिलेला बाईकऐवजी कारची ऑफर देणाऱ्या रायडरविरुद्ध कारवाई

दिल्ली-एनसीआरमध्ये रात्रीच्या वेळी रॅपिडोवरून बाईक टॅक्सी बुक करणाऱ्या एका महिलेला एक अत्यंत धक्कादायक अनुभव आला. मोनी शांडिल्य या महिलेने रात्री सुमारे ११ वाजत
दिल्ली-एनसीआरमध्ये रात्रीच्या वेळी रॅपिडोवरून बाईक टॅक्सी बुक करणाऱ्या एका महिलेला एक अत्यंत धक्कादायक अनुभव आला. मोनी शांडिल्य या महिलेने रात्री सुमारे ११ वाजता नोएडा सेक्टर-१६ मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक ४ वर उभे राहून बाईक टॅक्सी बुक केली होती. त्या महिलेने अॅपवर अनमोल मिश्रा नावाच्या रायडरच्या 'हीरो स्प्लेंडर' बाईकची माहिती पाहिली होती. मात्र, काही वेळातच तो रायडर बाईकऐवजी थेट कार घेऊन तिथे पोहोचला. या बदलामुळे मोनी गोंधळात पडल्या आणि त्यांनी रायडरला विचारले की, 'तुम्ही बाईक का आणली नाही?' त्यावर रायडरने उत्तर दिले की, 'बाईक खराब झाली आहे, त्यामुळे मी कार आणली आहे.' या उत्तरामुळे मोनीच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्यांनी कारमध्ये बसण्यास स्पष्ट नकार दिला.
मोनीच्या नकारानंतरही रायडरने त्यांना कारमध्ये बसण्यासाठी वारंवार आग्रह केला. या परिस्थितीमुळे मोनी घाबरल्या आणि त्यांनी मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आरडाओरडामुळे रायडर घाबरला आणि 'मी राइड कॅन्सल करतो' असे सांगत तिथून पळून गेला. त्याआधीच मोनीने स्वतःच राइड कॅन्सल केली होती. या घटनेनंतर मोनीने आपल्या अनुभवाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामुळे ती पोस्ट तातडीने व्हायरल झाली. यावर अनेक नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि बाईक टॅक्सी कंपन्यांकडे चालकांची पार्श्वभूमी आणि वाहनांची पडताळणी अधिक काटेकोरपणे करण्याची मागणी केली.





















