Father's Death in Old Age Home:वृद्धाश्रमात बापाचा तडफडून अंत

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका वृद्धाश्रमात घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ७० वर्षीय घनश्याम राजपूत यांचा वृद्धाश्रमात मृत्यू झाला, परंतु त्यांचा मृतदे
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका वृद्धाश्रमात घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ७० वर्षीय घनश्याम राजपूत यांचा वृद्धाश्रमात मृत्यू झाला, परंतु त्यांचा मृतदेह दोन दिवसांपर्यंत कोणत्याही नातेवाईकांनी उचलला नाही. त्यांच्या चार मुलांनी त्यांच्यासाठी अंत्यदर्शनाला येण्यास नकार दिला आणि फक्त मृत्यूप्रमाणपत्राची मागणी केली. घनश्याम यांनी आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलांना मोठे केले, पण वृद्धापकाळात त्यांना एकटा सोडले गेले. इंदौरमध्ये राहणारे घनश्याम यांच्याकडे कोणतीही संपत्ती नव्हती, तरीही त्यांनी आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सायकलीचे टायर-ट्यूब दुरुस्त करून काम केले. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी एकटा चार मुलांची जबाबदारी घेतली आणि त्यांना पायावर उभे केले. परंतु, त्यांच्या मुलांनी वृद्धापकाळात त्यांचा सांभाळ करणे टाळले. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांना दीड वर्षांपूर्वी इंदौर बस स्थानकावर बेवारस सोडले गेले. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना भोपाळच्या वृद्धाश्रमात दाखल केले, जिथे ते गेल्या तीन-चार वर्षांपासून राहत होते.
वृद्धाश्रमातील इतर वृद्धांनी सांगितले की, घनश्याम दररोज आशेने आपल्या मुलांची वाट पाहत असत. त्यांना विश्वास होता की, एक दिवस त्यांची मुले त्यांना भेटायला येतील. परंतु, त्यांच्या मृत्यूपूर्वी एकाही मुलाने त्यांची विचारपूस केली नाही. ४ ऑगस्ट रोजी घनश्याम यांचा वृद्धाश्रमातच मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर वृद्धाश्रमाच्या संचालिका माधुरी मिश्रा यांनी तातडीने त्यांच्या मुलांशी संपर्क साधला. सुरुवातीला मुलांनी विविध कारणे दिली, जसे की रेल्वेचे तिकीट मिळत नाही, बसमध्ये जागा नाही, त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. वृद्धाश्रमाने वारंवार विनंती केली तरीही मुलांना दया आली नाही. त्यांनी थेट सांगितले की, बापाने त्यांच्या आयुष्यात त्यांना संपत्तीत कोणताही वाटा दिला नाही, त्यामुळे त्यांना येण्याची आवश्यकता नाही.





















