Meta Faces Crisis: मेटावर संकट! भारतात माफी मागितल्यानंतर अमेरिकेत ५४ अब्ज रुपयांचा दंड; मार्क झुकरबर्गच्या कंपनीला मोठा दणका

जगभरात प्रसिद्ध असलेल्या सोशल मीडिया कंपनी 'मेटा' सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. भारतात अल्गोरिदमच्या उल्लंघनामुळे मेटाच्या अधिकाऱ्यांना कडक चौकशीला सामोर
जगभरात प्रसिद्ध असलेल्या सोशल मीडिया कंपनी 'मेटा' सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. भारतात अल्गोरिदमच्या उल्लंघनामुळे मेटाच्या अधिकाऱ्यांना कडक चौकशीला सामोरे जावे लागले आहे, तर अमेरिकेत न्यु मेक्सिको राज्याच्या न्यायालयाने कंपनीवर ५६७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ५४ अब्ज रुपयांचा दंड ठोठवला आहे. या दंडासोबतच न्यायालयाने युवा युजर्ससाठी मेटाच्या प्लॅटफॉर्ममध्ये मोठे बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने मेटाला जनतेसाठी 'पब्लिक न्यूसन्स'ची स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. मेटा कंपनीने तयार केलेल्या उत्पादनांमुळे युवा युजर्सना गंभीर सवय लागली आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर लहान मुलांना होणाऱ्या यौन शोषणापासून संरक्षण करण्यात अपयश आले आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
न्यु मेक्सिकोच्या सांता फे येथील न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश ब्रायन बीडशाइड यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. याआधीच्या सुनावणीत मेटाला ३७५ दशलक्ष डॉलर्स भरण्याचे आदेश देण्यात आले होते. कंपनीने युवा युजर्सच्या सुरक्षिततेबाबत खोटी माहिती पसरवून ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले, असे ज्युरीने स्पष्ट केले. सध्या, अमेरिका आणि इतर देशांमध्ये सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध युवा युजर्सच्या हानीच्या संदर्भात अनेक खटले दाखल केले जात आहेत, ज्यामुळे कायदेतज्ज्ञांचे लक्ष या मुद्द्यावर लागले आहे. मेटा कंपनीला तातडीने युवा-सुरक्षा उपाय लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरावर नियंत्रण, अल्पवयीन मुलांशी प्रौढ व्यक्तींच्या संपर्कावर मर्यादा, आणि बाल शोषणाच्या तक्रारींची योग्य समीक्षा यांचा समावेश आहे.



















