Ankur Warikoo's Driver Salary: अंकुर वारिकूंच्या चालकाच्या पगारावर चर्चा

अंकुर वारिकू, एक प्रसिद्ध लेखक आणि कंटेंट क्रिएटर, नेहमीच आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीच्या महत्त्वाबद्दल लोकांना जागरूक करत असतात. त्यांच्या अनेक व्हिडीओ आणि स
अंकुर वारिकू, एक प्रसिद्ध लेखक आणि कंटेंट क्रिएटर, नेहमीच आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीच्या महत्त्वाबद्दल लोकांना जागरूक करत असतात. त्यांच्या अनेक व्हिडीओ आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्स नेहमीच चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांनी त्यांच्या चालकाबद्दल एक पोस्ट लिंक्डइनवर शेअर केली आहे, ज्यात त्यांनी म्हटले की, 'मी माझ्या चालकाला दरमहा ५३,००० रुपये पगार देतो, ही माझी सर्वोत्तम गुंतवणूक आहे.' या विधानामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमठल्या आहेत. काही लोक त्यांच्या विचारांचे समर्थन करत आहेत, तर काहींनी त्यावर टीका केली आहे. वारिकूंच्या या विधानामुळे दोन गट तयार झाले आहेत, ज्यात एक गट त्यांच्या विचारांना मान्यता देत आहे, तर दुसरा गट त्यांच्यावर टीका करत आहे.
अंकुर वारिकू यांच्या पोस्टमध्ये त्यांनी दयानंद नावाच्या त्यांच्या चालकाबद्दल माहिती दिली आहे, जो गेल्या १३ वर्षांपासून त्यांच्या कुटुंबासोबत काम करत आहे. सुरुवातीला १५,००० रुपये महिना पगारावर रुजू झालेल्या दयानंद यांचा सध्याचा पगार ५३,३५० रुपये आहे. याशिवाय, त्यांना कुटुंबासाठी आरोग्य विमा, दिवाळीचा बोनस आणि एक स्कूटी देखील दिली गेली आहे. वारिकूंच्या मते, दयानंद हे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य बनले आहेत आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येतो. वारिकू म्हणतात, 'दयानंद हे आमचे चालक नसून आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. आम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो.'



















