Lumpy Virus: पशुपालकांनो सावधान! गुरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

खामगाव : लम्पी स्किन डिसीज (lsd) हा रोग पुन्हा एकदा गुरांसाठी धोकादायक ठरत आहे, त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. खामगाव तालुक्यातील काही गावांमध्ये गायी
खामगाव : लम्पी स्किन डिसीज (LSD) हा रोग पुन्हा एकदा गुरांसाठी धोकादायक ठरत आहे, त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. खामगाव तालुक्यातील काही गावांमध्ये गायींमध्ये आणि बैलांमध्ये लम्पी रोगाचे लक्षणे आढळून येत आहेत. या लक्षणांमध्ये अंगावर गाठी येणे, ताप, भूक कमी होणे आणि अशक्तपणा यांचा समावेश आहे. त्यामुळे पशुपालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचे आरोग्य गंभीरपणे प्रभावित होऊ शकते, तसेच दूध उत्पादनात घट होऊ शकते, ज्यामुळे दूध व्यवसायावर अवलंबून असलेल्या पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे या रोगाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.
पशुवैद्यकीय विभागाने या परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे आणि संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. खामगाव तालुक्यातील काही भागांमध्ये लम्पी रोगाची प्रमुख लक्षणे दिसून येत आहेत. ताप, त्वचेवर गाठी किंवा पुरळ येणे, डोळ्यांतून पाणी येणे, भूक मंदावणे आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. लम्पी हा संसर्गजन्य रोग असल्याने एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये त्याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे संशयित जनावराची वेळेत ओळख करून त्याचे विलगीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.





















