Nafed Kanda Kharedi: नाफेड कांदा खरेदीत घोटाळा; नाशिक जिल्ह्यातील 'या' खरेदी केंद्राची चौकशी होणार

सटाणा: कांदा खरेदीत झालेल्या घोटाळ्यामुळे बागलाण तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांची चौकशी करण्याची मागणी समविचारी शेतकरी संघटनांनी केली आहे. मूल्य स्थिरीकरण योजन
सटाणा: कांदा खरेदीत झालेल्या घोटाळ्यामुळे बागलाण तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांची चौकशी करण्याची मागणी समविचारी शेतकरी संघटनांनी केली आहे. मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड, एनसीसीएफ आणि इतर संस्थांनी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, परंतु या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कांदा वाहतूक करून या संस्थांनी परराज्यातील कांदा खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे, कारण त्यांच्या उत्पादनाची किंमत कमी झाली आहे आणि त्यांना योग्य दर मिळत नाहीय.
नाफेडच्या अधिकाऱ्यांनी खरेदीचे निकष डावलून संगनमत करून व्यवहार केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये निकृष्ट दर्जाचा काळसर कांदा खरेदी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. कांदा खराब होण्यास सुरुवात झाली असून, काही दिवसांत तो पूर्णतः सडून जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अंबासनकर, कार्याध्यक्ष अंताजी कोर, गणेश काकुळते, केशव सूर्यवंशी, सुभाष शिंदे आणि भास्कर बागुल यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.



















