Homemade Fertilizer for Plants:सुकलेली रोपं नव्याने फुलतील, घरगुती खतांचा वापर करा!

कधी कधी असे अनुभव येतात की, रोपांना पुरेसं पाणी दिलं तरी किंवा त्यांना आवश्यक सूर्यप्रकाश मिळाला तरीही त्यांची वाढ अपेक्षेनुसार होत नाही. काही रोपे सुकून जातात
कधी कधी असे अनुभव येतात की, रोपांना पुरेसं पाणी दिलं तरी किंवा त्यांना आवश्यक सूर्यप्रकाश मिळाला तरीही त्यांची वाढ अपेक्षेनुसार होत नाही. काही रोपे सुकून जातात किंवा त्यांना अपेक्षित फुलं येत नाहीत. यामागचं मुख्य कारण म्हणजे मातीतून रोपांना आवश्यक पोषण मिळत नाही. मातीचा कस कमी झाल्यामुळे रोपांची वाढ थांबते. त्यामुळे रोपांना योग्य खत देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांऐवजी, आपण घरगुती पदार्थांचा वापर करून एक उत्कृष्ट लिक्विड खत तयार करू शकतो. हे खत तयार करणे सोपे आहे आणि यामुळे आपल्या रोपांना आवश्यक पोषण मिळेल.
घरगुती लिक्विड खत तयार करण्यासाठी, सर्वप्रथम एका मोठ्या बादलीत १० लीटर पाणी घ्या. त्यात १ कप दूध घालून चांगलं मिसळा. दूधामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे रोपांची वाढ सुधारते. यानंतर, १ चमचा हिंग घेऊन तो १ वाटी पाण्यात विरघळा आणि हा मिश्रण १० लीटर पाण्यात टाका. हिंग मातीचा कस वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर, १ टेबलस्पून गूळ घालून तो पाण्यात चांगला विरघळा. गुळामुळे माती मोकळी आणि भुसभुशीत होते, ज्यामुळे रोपांना अधिक पोषण मिळतं. यानंतर, २ चमचे हळद घालून चांगलं मिसळा. हळदमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म रोपांना विविध संसर्गांपासून सुरक्षित ठेवतात.



















