Farmers Debt Relief in Maharashtra:राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकरी कर्जमुक्त

मुंबई : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५,०२८ कोटी रुपये कर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५,०२८ कोटी रुपये कर्जमुक्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या रकमेचे थेट ऑनलाइन हस्तांतरण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, आणि मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत की, कर्जमुक्तीचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत होईल आणि त्यांचा आर्थिक ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.





















