Amruta Dhongde Returns: अमृता धोंगडेची छोट्या पडद्यावर पुनरागमन

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर, ती स्टार प्
मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर, ती स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेत 'आमच्या लाडक्या नाईक बाई'मध्ये पुनरागमन करत आहे. यावेळी अमृता एक वेगळा अवतार धारण करणार आहे, कारण ती पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. १० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत, अमृता 'दर्शना लाड' उर्फ 'लाडबाई'च्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्राचे वर्णन करताना, ती गोड बोलणारी, पण मनाने अत्यंत धूर्त आणि कपटी आहे, असे सांगितले जाते. लाडबाई गावात प्रवेश करताना, ती एका राजकीय पक्षाच्या मदतीने जमिनी ताब्यात घेण्याचा डाव रचते. तिच्या गोड बोलण्यामागे एक मोठा धोका दडलेला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून, ती त्यांना आपल्या जाळ्यात अडकवते आणि नाईक बाईंच्या आयुष्यात नवे संकट निर्माण करते.
अमृता धोंगडेने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, "दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येताना मला खूप आनंद आणि उत्सुकता वाटते आहे. 'दर्शना लाड' ही भूमिका माझ्यासाठी एकदम वेगळी आहे. ती वरकरणी खूप गोड बोलते, परंतु तिच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ आणि वेगळा हेतू दडलेला आहे. मी पहिल्यांदाच ग्रे शेड्स असलेली भूमिका साकारत आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारताना, कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळते. प्रेक्षकांनाही माझा हा नवा अंदाज नक्की आवडेल, अशी मला आशा आहे."

















